तुम्ही वाहतूक नियम मोडलायं का ! दंड भरा अन्यथा वाहन परवाना रद्द

तात्या लांडगे
Friday, 13 November 2020

दंड न भरणाऱ्यांचा परवाना रद्द होणारच 
ज्या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, त्यांनी वेळेत दंड भरून घ्यावा. जे वाहनचालक दंड भरणार नाहीत, त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. तर ज्यांचा परवाना रद्द होऊ शकत नाही, त्यांच्यावर न्यायालयात खटला चालविला जाणार आहे. 
- दिपाली धाटे, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक

सोलापूर : विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट, ओव्हरस्पीड, मोबाइल टॉकिंग, ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह, लेन कटिंग, माल वाहतूक वाहनातून प्रवासी वाहतूक, विमा नाही, सिग्नल कटिंग, अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 1 जानेवारी ते 11 ऑक्‍टोबरपर्यंत शहरातील 38 हजार 990 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 24 लाख 50 हजार 800 रुपयांचा दंड केला आहे. त्यापैकी ई-चलनाद्वारे दंड केलेल्यांनी वेळेत दंड न भरल्यास त्यांचा परवाना आता रद्द केला जाणार आहे.

 

दंड न भरणाऱ्यांचा परवाना रद्द होणारच 
ज्या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, त्यांनी वेळेत दंड भरून घ्यावा. जे वाहनचालक दंड भरणार नाहीत, त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. तर ज्यांचा परवाना रद्द होऊ शकत नाही, त्यांच्यावर न्यायालयात खटला चालविला जाणार आहे. 
- दिपाली धाटे, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक

कोरोना काळात विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. शहर- ग्रामीणमधील तब्बल 60 हजार वाहनांकडून दंड वसूल करण्यात आला. मात्र, काही वाहनचालकांकडे पैसे नसल्याने त्यांना ई-चालनद्वारे दंडाची पावती देण्यात आली. मात्र, अद्याप सुमारे 18 हजारांहून अधिक वाहनचालकांनी दंडाची रक्‍कम भरलेली नाही. अशा वाहनचालकांनी वेळेत दंड न भरल्यास आता त्यांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने शहर- जिल्ह्यातील अपघातांत वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेत विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन वाहनचालकांना केले जात आहे. तरीही विनामास्क विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे आता हे पाऊल उचलले जात असल्याचेही वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. मार्चएण्डही आता जवळ येऊ लागल्याने ते टार्गेट पूर्ण करण्याच दृष्टीने कारवाईत वाढ झाल्याचीही चर्चा आहे. 

 

कारवाईचे स्वरुप 

 • विना हेल्मेट 
 • 26,862 
 • विनासिटबेल्ट 
 • 5,573 
 • ओव्हरस्पीड 
 • 2,106 
 • मोबाइल टॉकिंग 
 • 2,320 
 • ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह 
 • 186 
 • लेन कटिंग 
 • 1,477 
 • माल वाहतुकीतून प्रवासी वाहतूक 
 • 49 
 • विमा नाही 
 • 447 
 • सिग्नल कटिंग 
 • 150  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did you break the traffic rules? Pay penalty otherwise vehicle license revoked