
उरण : अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य मार्गावरील खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या दिघोडे गावातील नागरिकांनी चिखलात बसून अनोखे आंदोलन केले. या मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक, प्रवासी, विद्यार्थी आणि रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे तातडीने रुंदीकरण व काँक्रीटीकरण करावे, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. २५) दिघोडे फाट्यावर हे आंदोलन पार पडले.