केतकी चितळेवर कारवाई होणार; गृहमंत्र्यांची स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil

केतकी चितळेवर कारवाई होणार; गृहमंत्र्यांची स्पष्टीकरण

टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे सगळं ठरवून आणि जाणूनबूजून केलं जाणार वक्तव्य आहे. यावर कारवाई होणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलंय.

केतकी चितळे हीने फेसबूकवर केेेलेल्या पोस्टनंतर तीच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेल्या या पोस्टमध्ये शरद पवारांवर, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. त्यामुळे केतकी विरोधात पुण्याच्या कळवा पोलिस ठाण्यामध्ये कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजीनगर येथील सायबर सेलला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा: केतकी चितळेविरोधात पुण्यात गुन्हा, राष्ट्रवादी आक्रमक झाल्याने लवकरच अटक?

केतकीने या पोस्टमध्ये "ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक" असे शब्द वापरण्यात आले आहेत, या अक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आग्रमक भूमिका स्विकारली आहे.

कळवा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'केतकी चितळे हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संबधाने बदनामीकारक पोस्ट केली. यामुळे आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. अशा पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच केतकी चितळेने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. या महिलेने आणखी अशा काही पोस्ट करण्याची शक्यता आहे. यामुळे या महिलेविरुद्ध तक्रार देण्यात येत आहे.'

Web Title: Dilip Walse On Action Against Ketaki Chitale Over Offensive Post About Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top