फडणवीसांच्या आरोपाचं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून खंडण

ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट
Dilip Walse Patil on Devendra Fadnavis
Dilip Walse Patil on Devendra Fadnavisesakal
Updated on

Dilip Walse Patil on Devendra Fadnavis: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विरोधी सत्ताधारी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येतात. अशातच सत्ताधारी भाजपकडून विरोधी नेत्यांवर ईडीची चौकशी लावत असल्याचे आरोप सातत्याने होत असतात.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे मुंबई सीपी संजय पांडे यांना दिलं होतं म्हणतं मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Dilip Walse Patil on Devendra Fadnavis
Thackeray vs Shinde : कणकवलीत ठाकरे-शिंदे गटात राडा, पोलीस बंदोबस्त तैनात!

फडवीसांच्या आरोपानंतर तत्कालीन गृहमंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वळसे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, मात्र त्यांनी जे आरोप केले आहेत तस कोणताही प्रकार महाविकास आघाडी सरकराच्या काळात झालेला नाही.

मात्र देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे बोलले असतील, मात्र राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नव्हता. अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Dilip Walse Patil on Devendra Fadnavis
Devendra Fadanvis : "मविआने मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट दिलं होतं"

देवेंद्र फडणवीसांचा आरोप काय?

एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमामध्ये ते बोलत होते तेव्हा ते म्हणाले कि, ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं.

मी कोणताही काम केलं नव्हत, किंवा कोणती चूक केली नव्हती. त्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकतील. त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambegaon Super 23: Dilip Walse Patil Lauds Innovative Educational Initiative in Ghodegaon
Dilip Walse Patil and CM Devendra Fadnavis
Spiritual Grandeur: Former Minister Dilip Walse Patil Visits Religious Festivities in Ambegaon
Dilip Walse Patil reviews loan waiver progress in Ambegaon, calls for faster upload of remaining accounts.
Marathi News Esakal
www.esakal.com