वळसे पाटलांनी दिली उपोषणस्थळी भेट; संभाजीराजे म्हणतात, 'मी जागा सोडणार...'

वळसे पाटलांनी दिली उपोषणस्थळी भेट; संभाजीराजे म्हणतात, 'मी जागा सोडणार...'

मुंबई: मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati) मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या भेटीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गेले होते. या भेटीवेळी संभाजीराजेंनी म्हटलंय की, दिलीप वळसे पाटील आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. वर्षावरील बैठकीत काही मुद्दे घेण्यात आले. त्याचंही आम्ही स्वागत करतो. पण आमचे हे ६ मुद्दे देखील निकाली लागल पाहिजेत. साहेब स्वत: त्या सर्व आंदोलना वर लक्ष ठेवून आहेत.

वळसे पाटलांनी दिली उपोषणस्थळी भेट; संभाजीराजे म्हणतात, 'मी जागा सोडणार...'
यूपीत मतदान केंद्राजवळ सायकलवर झाला बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, एक जखमी

पुढे ते म्हणाले की, मागे मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसात प्रश्नमार्गी लावू असे म्हटले होते, त्या आजतागायत मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यांच्या खात्याशी संबधित विषयांवर ते स्वत: लक्ष घालणार आहेत. चर्चेला आता सुरूवात झाली आहे. जे काही निर्णय होणार ते लेखी स्वरुपात व्हावेत. अपेक्षा नाहीत की तुम्ही काही बोलावं. पण मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी जागा सोडणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय.

आम्ही कुठलाही पक्ष घेऊन आलो नाही. आंदोलनात सहभागी झालेले सर्व स्व-इच्छेने आलेले आहेत. आम्ही कुणाचीही सुपारी घेऊन आलेलो नाही. सरकारला वेळ देऊ चर्चेतून मार्ग काढू देऊयात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

वळसे पाटलांनी दिली उपोषणस्थळी भेट; संभाजीराजे म्हणतात, 'मी जागा सोडणार...'
संभाजीराजेंना अभिजीत बिचुकलेंचा सल्ला; म्हणाले, 'सातारच्या गादीचा वारस...'

यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलंय की, संभाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे चर्चेतील सर्व मुद्यांच्या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न कसे मार्गी लागतील असा प्रयत्न करीन. आपण ही सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com