परमबीर सिंग यांचे थेट ‘भाजप कनेक्शन’; या दिग्गज नेत्याचे आहेत व्याही

Direct BJP connection of Parambir Singh Nagpur news
Direct BJP connection of Parambir Singh Nagpur news

नागपूर : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे केलेल्या आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या हाच विषय महाराष्ट्रात चर्चेला जात आहे. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. यामुळे भाजप आक्रमक झाली असली तरी परमबीर सिंगचे भाजपशी संबंध असल्याचे आता पुढे आले आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा मुलगा रोहन सिंग याचे लग्न भाजपचे नेते सागर मेघे यांची कन्या राधिका हिच्याशी झाले आहे. याची अनेकांना माहिती नाही. सागर मेघे हे दत्ता मेघे यांचे सुपुत्र आहे. काँग्रेसमध्ये ३६ वर्षे राहिल्यानंतर दत्ता मेघे यांच्या कुटुंबाने २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. वडील दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सागर यांनी रिक्त झालेल्या वर्धा जिल्ह्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दत्ता मेघे यांचा दुसरा मुलगा समीर हे हिंगणा विधानसभेचे आमदार आहे.

परमबीर सिंगच्या भाजप संबंधामुळे सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणही दडपले जात आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणावरून केंद्र सरकार आणि काही भाजप नेते उद्धव सरकारवर आरोप करीत आहेत. येत्या काही दिवसांत भाजप-शिवसेनेला अधिक गंभीर आरोपांना सामोरे जावे लागू शकते. सुशांतचे प्रकरण माध्यमांतून दडपले गेले. यामुळे लोकांचा संताप सातत्याने वाढत आहे. हा आक्रोश वाढविण्यात सीबीआयची शांततादेखील कारणीभूत ठरत आहे.

बंगळुरूमध्ये झाला होता विवाह

परमबीर सिंग यांचा मुलगा रोहन सिंग आणि सागर मेघे यांची कन्या राधिका यांचा सन २०१७ मध्ये विवाह पार पडला. हा आलिशान आणि महागडा विवाह सोहळा बंगळुरूमध्ये झाला होता. त्यावेळी परमबीर सिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त होते. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यात आले होते. दुसरीकडे याचाही विचार केला पाहिजे की दत्ता मेघे यांचे कुटुंब अवघ्या सहा वर्षांपूर्वीच भाजपमध्ये आले.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com