esakal | धक्‍कादायक ! आयटीआय कॉलेजचा निदेशक वीस हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

1cogivmon_0.jpg

'या' पथकाने केली कारवाई 
ऍन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पाटील, उपअधिक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कविता मुसळे, जगदिश भोपळे, हवालदार संजयकुमार बिराजदार, स्वप्नील सन्नके, प्रसाद पकाले, अर्चना स्वामी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

धक्‍कादायक ! आयटीआय कॉलेजचा निदेशक वीस हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : येथील विजयसिंह मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालयाने अकरावी व बारावीसाठी क्रॉप सायन्स या अभ्यासक्रमाचा ऑनलाईन प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यानुसार आयटीआय कॉलेजचे निदेशक स्वप्नील दत्तात्रय सांगळे यांना संबंधित कॉलेजची पाहणी करुन शिफारसीनुसार प्रस्ताव सादर करण्यास शासनाकडून सांगण्यात आले होते. त्यासाठी सांगळे याने कॉलेज प्रशासनाकडे 20 हजारांची मागणी केली. रविवारी (ता. 12) लाचेची रक्‍कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगळे याला रंगेहाथ पकडले. 


अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी क्रॉप सायन्स या अभ्यासक्रमास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव कॉलेजतर्फे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सचिवांना आणि व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयास ऑनलाईन पाठविला होता. त्यानुसार संबंधित कॉलेजची पाहणी करुन शिफारसीसह फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सोलापुरातील आयटीआय कॉलेजचे निदेशक सांगळे यांना शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार सांगळे याने कॉलेजची पाहणी करीत रविवारी (ता. 12) 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तत्पूर्वी, यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सांगळे याला लाचेची रक्‍कम घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

'या' पथकाने केली कारवाई 
ऍन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पाटील, उपअधिक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कविता मुसळे, जगदिश भोपळे, हवालदार संजयकुमार बिराजदार, स्वप्नील सन्नके, प्रसाद पकाले, अर्चना स्वामी यांच्या पथकाने ही कारवाई केली.