
सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यांना मिळणाऱ्या बोनसमुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलीस विभाग अपवाद आहे. करोना काळात जीव धोक्यात घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या राज्यातील पोलिसांमध्ये पोलीस बोनस तसेच अॅडव्हान्स न दिल्यामुळे नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. (Displeasure The Police State As They Will Not Get Diwali Bonus )
प्रवासी आणि गणवेश भत्ताही मिळालेला नाही. मागच्या दिवाळीमध्ये केवळ सातशे पन्नास रुपयांची कुपन देऊन तोंडाला पाने पुसली होती. त्यामुळे यंदाची दिवाळी तर गोड होईल अशी आशा वाटत होती मात्र, दिवाळी तोंडावर येऊनही अॅडव्हान्स पगार नाही. कोरोनाकाळी पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली मात्र पोलिसांनी काही मिळाले नव्हते. मुंबईत २४तास काम करणाऱ्या पोलिसांची अशी हेटाळणी का करतायत अशी विचारणा पोलिस दलाकडून करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आर.आर. चव्हाण या पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून पोलिसांना एक महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याची मागणी केली आहे. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय, अर्थमंत्री कार्यालय आणि राज्याचे पोलीस महासंचालक कार्यालय अशा विविध कार्यालयांना पाठवण्यात आले आहे.
अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस मिळणार नसल्यामुळे समाजमाध्यमांवर खदखद व्यक्त केली. पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांनी दिवाळी बोनस देण्यासाठी सकारात्मकता दर्शवावी. असे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.