esakal | महाविकास आघाडीच्या 'या' दोन मंत्र्यामध्ये खुर्चीवरून वाद
sakal

बोलून बातमी शोधा

Dispute between Ashok Chavhan and Chagan Bhujbal Cabinet meeting

महाविकासआघाडीच्या मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि मंत्री अशोक चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ या दोघांमध्ये खटके उडाले आहेत.

महाविकास आघाडीच्या 'या' दोन मंत्र्यामध्ये खुर्चीवरून वाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला असला तरी महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचे चित्र सध्या दिसत नाही. महाविकासआघाडीच्या मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि मंत्री अशोक चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ या दोघांमध्ये खटके उडाले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कॅबिनेट बैठकीत खुर्चीवरून बसण्यावर हा वाद झाला असल्याचे बोलले जात आहे.  खातेवाटपानंतर आज (ता.०७) मंत्रिमंडळाची पहिली बैठक होती. या बैठकीतच हा वाद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अशोक चव्हाण यांनी हे वृत्त नाकारलं असून असा कुठलाही वाद झाला नसल्याचे म्हटले आहे.

शिवभोजन थाळीचा फायदा कुणाला? गोर गरिबाला की आणखी कुणाला?

दरम्यान, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर होते, यावरूनही ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ काही केल्या मिटत नव्हता. मंत्रिमंडळ वाटपाचा हा घोळ मिटलेला असतानाच छगन भुजभळ आणि अशोक चव्हाण यांच्यातील वाद समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.