शरद पवारांच्या दौऱ्यात नाराजी ! राष्ट्रवादीचे 'हे' महापौर म्हणाले...25 वेळा फोन करुनही पालकमंत्र्यांनी फोन उचललाच नाही  

तात्या लांडगे
Sunday, 19 July 2020

माजी महापौर सपाटे म्हणाले... 

 • कोरोना काळात वयाच्या 81 वर्षांच्या शरदचंद्र पवार यांचा सोलापूर दौरा; पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी 
 • पवार साहेबांना भेटून त्यांच्याकडून प्रेरणा घेणे, त्यांना पाहण्यासाठी पालकमंत्री व राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना भेटण्याची संधी द्यायला हवी होती 
 • 45 वर्षाच्या राजकीय प्रवासातील हा पहिलाच प्रसंग; पवार साहेब सोलापुरात आले मात्र, प्रत्यक्षात भेटता आले नाही 
 • पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना शनिवारी (ता. 18) 25 वेळा फोन केला, मात्र त्यांनी उचललाच नाही 
 • महेश गादेकर, दिलीप कोल्हे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असतानाही त्यांना भेटण्याची मिळाली नाही संधी 
 • पालकमंत्री आणि शहराध्यक्षांनी चुकीच्या पध्दतीने नियोजन केले; कदाचित कोरोनामुळे साहेबांनी काही सूचना केल्या असतील 
 • शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतोय, मृत्यूदरही खूप आहे; त्यामुळे शहरातील पदाधिकाऱ्यांकडून माहिती मिळावी यासाठी भेट आवश्‍यक होती

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. दुसरीकडे राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत सोलापूर शहराचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आले. मात्र, शहरातील कोरोनाची स्थिती सांगण्याकरिता, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याच्या निमित्ताने काही निवडक पदाधिकाऱ्यांना भेटण्याची संधी मिळायला हवी होती. परंतु, पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्षांनी चुकीचे नियोजन केल्याने भेट घेता आली नसल्याची खंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी व्यक्‍त केली. 

किल्लारी भुंकपावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार सोलापुरात मुक्‍कामी होते. त्यानंतर ते सोलापुरचे पालकमंत्री असताना त्यांचे पुण्याच्या तुलनेत सोलापुरवरील प्रेम अनेकांनी अनुभवले आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारातून प्रगती केलेले खूपजण आहेत. त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळावी, त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळावी, या दृष्टीने पालकमंत्री व शहराध्यक्षांनी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांना संधी द्यायला हवी होती. तशी यादी पाठविण्याची गरज होती. मात्र, त्यांनी तसे केले नसल्यानेच बाहेर थांबावे लागले, असेही श्री. सपाटे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

माजी महापौर सपाटे म्हणाले... 

 • कोरोना काळात वयाच्या 81 वर्षांच्या शरदचंद्र पवार यांचा सोलापूर दौरा; पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी 
 • पवार साहेबांना भेटून त्यांच्याकडून प्रेरणा घेणे, त्यांना पाहण्यासाठी पालकमंत्री व राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना भेटण्याची संधी द्यायला हवी होती 
 • 45 वर्षाच्या राजकीय प्रवासातील हा पहिलाच प्रसंग; पवार साहेब सोलापुरात आले मात्र, प्रत्यक्षात भेटता आले नाही 
 • पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना शनिवारी (ता. 18) 25 वेळा फोन केला, मात्र त्यांनी उचललाच नाही 
 • महेश गादेकर, दिलीप कोल्हे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असतानाही त्यांना भेटण्याची मिळाली नाही संधी 
 • पालकमंत्री आणि शहराध्यक्षांनी चुकीच्या पध्दतीने नियोजन केले; कदाचित कोरोनामुळे साहेबांनी काही सूचना केल्या असतील 
 • शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतोय, मृत्यूदरही खूप आहे; त्यामुळे शहरातील पदाधिकाऱ्यांकडून माहिती मिळावी यासाठी भेट आवश्‍यक होती

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dissatisfied with Sharad Pawars tour The NCP mayor said that despite calling 25 times, the Guardian Minister did not pick up the phone