शिवसेनेच्या वचननाम्यातील ‘या’ योजनेचा मे महिन्यात ‘एवढ्यां’नी घेतला लाभ

Distribution of Shivbhojan Thali in the month of May in Maharashtra
Distribution of Shivbhojan Thali in the month of May in Maharashtra

सोलापूर : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये गरजुना राज्यात शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळाला आहे. उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच गरजुंवर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून सरकारने १० रुपयावरुन पाच रुपयात शिवभोजन थाळी सुरु केली होती. मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ४० थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
मार्चमध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यानंतर सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत गेली. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. त्यात मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर नागरिकांचे जेवणाअभावी हाल होऊ नये, यासाठी सरकारने  शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून तीन महिन्यासाठी पाच रुपयात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला.

 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
असा ठरला दर...

शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात ५० रुपये प्रती थाळी असून, ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या ५ रुपयांव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी ३० रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येईल, असा निर्णय एफ्रिलमध्ये घेण्यात आला होता. ही भोजनालये सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सुरु असतात. या शिवभोजन केंद्र चालकांना देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
काय आहे योजना ...
राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने जानेवारीपासून राज्यात शिवभोजन योजना सुरु केली. यामध्ये गरीब व गरजू व्यक्तीला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यात येते. शिवभोजन थाळीत भोजनालयासाठी येणाऱ्या व्यक्तीला दोन चपात्या, एक वाटी भाजी, भात, एक वाटी वरण दिले जाते. खानावळ, एनजीओ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यापैकी जो सक्षम असेल त्याची ही योजना सुरु करण्यासाठी निवड करण्यात आली. गरजू व गरिबांची संख्या जास्त असणाऱ्या ठिकाणी ही योजना सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली होती. यामध्ये एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, सरकारी कार्यालये अशा ठिकाणाची निवड केली जाणार होती. राज्यात ८३८ शिवभोजन केंद्रं आहेत. यामाध्यमातून १ ते ३१ मेपर्यंत ८३८ शिवभोजन केंद्रातून ३३ लाख ८४ हजार ४० थाळ्याचे वाटप झाले आहे.
कधी झाली सुरु शिवभोजन थाळी 
२०१९ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या वचननाम्यान गरजुंना स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे सुरु करण्याचे अश्‍वासन देण्यात आले होते. त्यानुसार राज्यात २६ जानेवारीपासून शिवभोजन थाळीची योजना सुरु झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com