अत्याचाराचे राजकारण करू नका रामदास आठवले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

औरंगाबाद :"मुले पोहायला गेली म्हणून अमानुष मारहाण करणे राज्याच्या प्रतिमेला काळिमा लावणारी घटना आहे. हा सवर्ण-दलितांचा वाद नाही. त्या मुलांच्या पालकांना समजावून सांगता आले असते. या घटनेत गुन्हेगार कोणत्याही समाजाचा असला, तरी गुन्हेगार आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई होईल,'' असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भाजपची सत्ता आहे म्हणून या घटनेचे राजकारण करू नका, असेही ते म्हणाले. 

जामनेर तालुक्‍यातील वाकडी गावाच्या त्या पीडित मुलांची व कुटुंबीयांची भेट आठवले यांनी घेतली. तेथून औरंगाबदला आल्यावर सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की चौघांवर "ऍट्रॉसिटी' लावण्यात आला असून, दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. सामाजिक न्याय खात्याने पीडितांना एक लाखाची मदत केली असून, रिपब्लिकन पक्षाच्या वतीनेही प्रत्येकी पंचवीस हजारांची मदत केली आहे. मुख्यमंत्री विदेश दौऱ्याहून परतल्यावर मुख्यमंत्री निधीतून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पीडित मुलाच्या आईने भीती व्यक्त केल्याने पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. मातंग समाजाच्या दोन्ही कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांनाही या प्रकरणात लक्ष देण्यास सांगितले आहे. 

आंबेडकरवादी नक्षलवादी नाहीत 
कोरेगाव भीमा व एल्गार परिषदेचा कुठलाही संबंध नाही; परंतु ती दंगल नियोजित होती. परिषद घेण्याचा कुणालाही अधिकार आहे. या परिषदेतील आंबेडकरवादी हे नक्षलवादी नाहीत. ज्यांचे थेट संबंध नक्षलवादाशी आहेत त्यांची चौकशी झाली. पुरावे असलेल्यांनाच अटक झाली. संभाजी भिडे यांच्याबद्दल पुरावे असतील तर त्यांना अटक करावी, अशी मागणी आठवले यांनी केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not Politics about violence - Ramadas Athavale