दररोज करा सुर्यनमस्कार मिळेल ‘ड’ जीवनसत्व! चरबी कमी करण्यासाठी अन्‌ शरीराचा स्टॅमिना वाढण्यासाठीही उपयुक्त

आहार आणि विहार हे स्वास्थ्य टिकविणारे आयुष्याचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. आहार हे आयुर्वेदशास्त्रानुसार ‘महाभैषज्य’ आहे. अर्थात आहारामध्येच स्वयंभू औषधीय गुणधर्म आहेत. त्याबरोबरच विहार म्हणजे जीवनशैली ही देखील स्वास्थ्य रक्षणाचा गाभा आहे. त्यात प्रामुख्याने शरीराच्या हालचालींचा समावेश होतो.
Surya Namaskar Benefits
Surya Namaskar Benefits esakal
Updated on

सोलापूर : जीवनाच्या परिपूर्णतेला आरोग्याच्या दृष्टीने सिद्ध करणारा सूर्यनमस्कार हा सर्व व्यायाम प्रकारातील सर्वश्रेष्ठ असा व्यायाम आहे. भारतीय संस्कृतीने निरोगी जीवनासाठी दिलेली ही एक देणगीच आहे.

आहार आणि विहार हे स्वास्थ्य टिकविणारे आयुष्याचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. आहार हे आयुर्वेदशास्त्रानुसार ‘महाभैषज्य’ आहे. अर्थात आहारामध्येच स्वयंभू औषधीय गुणधर्म आहेत. त्याबरोबरच विहार म्हणजे जीवनशैली ही देखील स्वास्थ्य रक्षणाचा गाभा आहे. त्यात प्रामुख्याने शरीराच्या हालचालींचा समावेश होतो. ज्या कोणत्या क्रियेद्वारे आपण शरीराचे बल वाढवण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे व्यायाम होय. स्थिरत्व टिकविणे आणि बळ वाढविणे या दोन्ही गोष्टी व्यायामातून साध्य होतात.

आरोग्याचा दाता सूर्य

आरोग्याचे दान सूर्याकडून मिळते हे तत्व मानले गेले आहे. सूर्य हा जैव-ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. ज्या आधारावर प्राणिमात्रांचे पोषण होते. त्या अन्न-धान्य पिकांची आणि औषधी वनस्पतीची रुजवात आणि वाढ सूर्यप्रकाशामुळे होते. म्हणून तो आरोग्याचा कारक आहे. तो उर्जेचा स्त्रोत असल्याने त्यास व्यायामातून नमस्कार करत त्याची उर्जा आपल्याला देखील मिळवता येते. म्हणून सकाळी सूर्योदयास सूर्यनमस्कार घातला जातो.

--------------------------------------------------------------------------------------------

जीवनसत्व ड व कॅल्शियम स्त्रोत

सूर्य किरणांपासून शरिराला जीवनसत्व ड मिळते. हे जीवनसत्व शरिरातील अस्थीची कॅल्शियम शोषण्याची शक्ती वाढवतो. त्यामुळे अस्थींना बळकटी मिळते. सूर्य नमस्कारातून शरीराचा प्रत्येक भाग सूर्यकिरणाला सामोरे जाऊन त्यास आरोग्य लाभ होतो.

-----------------------------------------------------------------------------------------------

चरबी कमी करण्यासाठी अन्‌ शरीराचा स्टॅमिना वाढण्यासाठीही उपयुक्त

सूर्यनमस्काराने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते. तसेच शरीर सुगठीत राहते. तसेच शरीराचा स्टॅमिना वाढवण्यास तो पुरक ठरतो. सूर्याचे अग्नी तत्व हे जठराग्नीला संतुलीत ठेवण्याचे काम करते. या सूर्यनमस्काराच्या सरावात नियंत्रित व लयबद्ध श्वसनाने त्याचे परिणाम अधिक मिळतात.

---------------------------------------------------------------------------------------------

मंत्रशक्तीचा उपयोग

सूर्यनमस्काराच्या व्यायामाला ज्या पद्धतीने लयबध्द श्वासाचा आयाम चांगला ठरतो. त्याप्रमाणे मंत्राचा देखील उपयोग प्रभावी ठरतो. सूर्याची बारा समानार्थी नावे त्या सौरशक्तीपासून मनुष्याला होणाऱ्या विविध फायद्यांची सूचक आहेत. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पूष्ण, हिरण्यगर्भ, मरिची, आदित्य, सवितृ, भास्कर व अर्क या बारा नावाचे मंत्र त्यास जोडले आहेत.

आरोग्यदायी जीवनाचा अनुभव देण्याची ताकद सूर्यनमस्कारात

सूर्यनमस्काराने शरीरातील आठ अंगांना व्यायाम घडतो. हा पूर्ण व्यायाम मानला गेला आहे. सकाळी उपाशीपोटी हा व्यायाम करणे आवश्यक आहे. आरोग्यदायी जीवनाचा अनुभव देण्याची ताकद सूर्यनमस्कारात आहे.

- दत्तात्रय चिवडशेट्टी, जिल्हा गटप्रमुख, भारतीय योग संस्था, सोलापूर

-----------------------------------------------------------------------------------------------------

सूर्यनमस्कारामुळे शरिरातील सर्व अवयवांना व्यायाम मिळतो

सकाळी सूर्योदयाला श्वासाचे योग्य नियमन करत १२ सूर्यनमस्कार घालण्याचे महत्त्व आहे. त्यासोबत १२ मंत्राचा उपयोग केला जातो. सूर्यनमस्कारामुळे शरिरातील सर्व अवयवांना व्यायाम मिळतो. तसेच पोटाचे स्नायू देखील मजबूत होतात.

- रजनी अवसेकर, योग शिक्षिका, हुतात्मा बाग, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com