Vinayak Mete Death| कसा झाला अपघात? डॉक्टरांनी दिले स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Mete Death: कसा झाला अपघात? डॉक्टरांनी दिले स्पष्टीकरण

Vinayak Mete Death: कसा झाला अपघात? डॉक्टरांनी दिले स्पष्टीकरण

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा गाडीच्या अपघातात मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. त्यांच्या या अपघाती मृत्यूवर डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

डॉक्टरांनी काय सांगितले?

नायक मेटे यांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं, त्यावेळी त्याना तपासण्यात आलं. रुग्णालयात दाखल करताना त्यांना पल्स नव्हते. याचाच अर्थ विनायक मेटे यांची नाडी तपासली असता नाडीदर शून्य होता. तर हार्टबिटही नव्हते. ईसीजीमध्ये विनायक मेटे यांचा रिपोर्ट फ्लॅट लाईनप्रमाणे आलेला होता. तर बिपी अर्थात ब्लड प्रेशरही नव्हतं. त्यामुळे तेव्हा त्यांना तपासण्यात आलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रुग्णलयात आणण्यापुर्वीच त्यांचे निधन झाले होते असे मेडीकल डायरेक्टर कुलदीप सलगोत्रा यांनी सांगितले.

त्यांच्यासोबत एक ड्रायव्हर आणि पोलिस होता. त्या दोघांनाही गंभीर जखम झाली आहे. जो पोलिस होता त्यालादेखील गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या लिव्हर, डोके, आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मेटे यांचे अपघातामध्ये निधन कसे झाले हे पोस्टमार्टन रिपोर्टमध्ये समजेल. असेदेखील डॉक्टरांनी सांगितले.

मृत्यूचं कारण नेमकं काय?

विनायक मेटे यांच्या डोक्याला मागच्या बाजूस मोठा मार बसला होता. त्याामुळे ब्रेनस्ट्रेम इंजरीमुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याचीही आशंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. आता पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूबाबात अधिक खुलासा होऊ शकेल, असंही वरिष्ठ डॉक्टरांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर तातडीने पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये उपचार सुरू होते. मात्र, काळाने घात केला.

Web Title: Doctor Clarification On Vinayak Mete Accident Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :vinayak mete