Video: श्वानाने दिली भजन गायनाला साथ...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

एका देवळामध्ये भजन सुरू असताना श्वान साथ देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, संबंधित व्हिडिओ कोणत्या गावामधील आहे, हे समजू शकलेले नाही.

पुणे: एका देवळामध्ये भजन सुरू असताना श्वान साथ देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, संबंधित व्हिडिओ कोणत्या गावामधील आहे, हे समजू शकलेले नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मंदिरात रात्रीच्यावेळी ग्रामस्थांचे भजन सुरू होते. त्याच वेळी तिथे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या श्वानाने ग्रामस्थांच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियाव असाच एका व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक व्यक्ती रानू मंडलचे तेरी मेरी कहानी हे गाणे हार्मोनियमवर वाजवत आहे. याचवेळी त्याच्या शेजारी असलेले श्वान नक्कल करत होते. या व्हिडिओला अर्ली मोर्निग रियाज असे कॅप्शन देऊन सोशल मीडियावर पोस्ट केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dog trying to sing a bhajan with people in tempal video viral