कोरोनाला घाबरू नका; प्रत्येकाने काळजी घ्या! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

जर ताप, खोकला आणि श्‍वास घ्यायला त्रास होत असेल; तर डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे. 

काय काळजी घ्यावी... 
- अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने किंवा साबण-पाण्याने हात वरचेवर धुवावेत. 
- खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिश्‍यू पेपर धरावा. हा टिश्‍यू लगेच कचरापेटीत टाकावा. 
- ताप आणि खोकला असलेल्या रुग्णाचा सहवास टाळावा. 
- कोरोनाबाधित भागात प्रवास केला असेल आणि जर ताप, खोकला आणि श्‍वास घ्यायला त्रास होत असेल; तर डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे. 
- प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पर्श करू नका. 
- कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस खाऊ नका. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यात केलेल्या सुविधा 
- पाच वर्षांखालील बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकला आणि न्यूमोनियाची लक्षणे असल्यास रुग्णालयात भरती करा. 
- प्रौढांमध्ये आणि पाच वर्षांवरील बालकांमध्ये 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप अचानक आल्यास, तीव्र खोकला, घसा बसणे, दम लागणे, श्‍वास घेण्यास अडथळा वाटणे, अशी लक्षणे असल्यास त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करा. 
- संसर्ग झालेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवा. 

सांसर्गिक आजार टाळण्यासाठी 
- बाहेरून घरी आल्यानंतर साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवा. 
- जेवणामध्ये पौष्टिक आहार घ्यावा. 
- लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या अशा आरोग्यदायी घटकांचा समावेश आहारात असावा. 
- पुरेशी विश्रांती आणि झोप सुदृढ आरोग्यासाठी गरजेची. 
- दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्या. 
- घरात अथवा बाहेर कोठेही असो, शिंकताना, खोकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरा. 
- शरीरात ताप असेल, कणकण येत असेल; तर लगेचच डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. 
- फ्लू प्रतिबंधक लस घेतल्याने संभाव्य धोका टळतो. 
- गरोदर माता, मधुमेह अथवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि स्थूल व्यक्तींनी ही लस घेणे आवश्‍यक आहे. याशिवाय, जुनाट गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनीही ही लस डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घ्यावी. 
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. फ्लूची लक्षणे असल्यास इतरांशी हस्तांदोलन करू नका. 
- सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. औषधांचा कोर्स डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण करा, तो अर्धवट सोडू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't be afraid of Corona; Take care of everyone