Budget 2019 : अर्थसंकल्प शेतीसाठी केवळ बोलाची कढी- डॉ.अजित नवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

शेती आणि ग्रामीण विकासाची केवळ भाषा करायची प्रत्यक्षात या क्षेत्राच्या विकासासाठी आर्थिक तरतूद मात्र करायची नाही, याचा पुन्हा एकदा खेदजनक प्रत्यय केंद्रीय बजेटच्या निमित्ताने आला असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्प 2019 :
मुंबई : शेती आणि ग्रामीण विकासाची केवळ भाषा करायची प्रत्यक्षात या क्षेत्राच्या विकासासाठी आर्थिक तरतूद मात्र करायची नाही, याचा पुन्हा एकदा खेदजनक प्रत्यय केंद्रीय बजेटच्या निमित्ताने आला असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविल्यामुळे शेतीमालाचा उत्पादनखर्च आणखी वाढणार आहे. शेतीमालाच्या आधारभावात अत्यन्त तुटपुंजी वाढ करून सरकारने अगोदरच शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला होता. आता आधार भावात शेतीमाल खरेदी करण्यासाठी कोणतीही ठोस तरतूद न केल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहणार असल्याचेही नवले म्हटले आहे.

व्यापाऱ्यांना पेंशन योजना जाहीर केली जात असताना जाहीरनाम्यात आश्वासन दिले गेले असतानाही शेतकरी पेंशन बाबत मात्र नकारघंटा वाजवण्यात आली आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा व्यक्त करताना सिंचन, रोजगार, ग्रामीण आरोग्य, विमा, गोदामे, बाजार सुधारणा याबाबत मात्र पुरेशी तरतूद करण्यात आलेली नाही. एकंदरीत मांडण्यात आलेला अर्थसंकल्प शेती  व ग्रामीण भागासाठी बोलाचा भात बोलाची कढी असाच आहे. केवळ बोलाचा कढीने विकासाची भूक भागणार नाही हे वास्तव असल्याचे नवले यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Ajit Nawale says Hopeless Budget for Farmers