अनुसूचित जाती (Scheduled Caste), नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वती उपलब्ध करून देण्यासाच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली आहे.
Dr. Babasaheb Ambedkar Krushi Yojana : शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असतात. तथापि, त्यातील कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अनेक जण अशा योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ते नियमित लागणाऱ्या कागदपत्रांची फाइल तयार करण्याची गरज असते. कोणत्याही जाती-जमातीचे शेतकरी अऩुदानापासून (Farmer) वंचित राहू नये म्हणून संबंधित जमातीसाठी वेगळ्या अनुदानाची योजना तयार करण्यात आलेल्या आहेत.