डॉ. मृणालिनी फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नागपूर - येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर आज नियुक्‍ती केली. 

डॉ. एन. एन. मालदार यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दहा डिसेंबर 2017 रोजी संपल्यापासून हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. 

डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मध्य प्रदेशातील सागरच्या डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठातून अर्थशास्त्र, तसेच इकॉनॉमेट्रिक्‍स या विषयांत एम.ए., तसेच पीएच.डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन, तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. महिला महाविद्यालयात 1983 मध्ये त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. यानंतर 2003 मध्ये त्यांची महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2011-2015 या दरम्यान त्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्या होत्या. सध्या त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्‌वत परिषदेवर राज्यपाल नामित सदस्य म्हणून कार्यरत आहेत. 

सोलापूर विद्यापीठात बराचसा भाग ग्रामीण आहे. त्या भागातील महाविद्यालयांचा विकास करण्यासाठी आणि डिजिटलायझेशन करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. 
- डॉ. मृणालिनी फडणवीस, सोलापूर विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू 

Web Title: Dr Mrunalini Fadnavis to be new Vice Chancellor of Solapur University