DRDO Espionage Case : कुरुलकरसह अजून एक अधिकारी हॅनी ट्रॅपमध्ये! समोर आली धक्कादायक माहिती

DRDO Espionage Case  ATS suspected  Another officer to be caught in honeytrap along with Pradeep Kurulkar
DRDO Espionage Case ATS suspected Another officer to be caught in honeytrap along with Pradeep Kurulkar

हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (ATS) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडालेली असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी प्रदीप कुरुलकर यांच्यासह अन्य एक अधिकारी देखील हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय एटीएसला असल्याचे समोर आले आहे.

डीआरडीएचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी अग्नी, ब्रम्होस, क्षेपणास्त्रविरोधी मिसाइलची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. यानंतर आता ते ज्या महिलेच्या संपर्कात होते, त्याच महिलेच्या संपर्कात अन्य एक अधिकारी असल्याचे एटीएसच्या तपासातून समोर आले आहे.

त्यामुळे हा अधिकारी देखील हनी ट्रॅप प्रकरणात अडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर एटीएसने या अधिकाऱ्याला देखील ताब्यात घेतले असून त्याच्याकडे साक्षीदार म्हणून एटीएस पाहत आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा- Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ATS ने न्यायालयात काय सांगितल....

एटीएसने न्यायालयात सांगितले की, जेव्हा ते डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या कॉल आणि डेटा तपशीलांची छानणी करत होते तेव्हा त्यांना या गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अन्य अधिकाऱ्याचा नंबर सापडला. त्यानंतर या दुसऱ्या अधिकाऱ्याने महिलेसोबत कोणतीही गोपनीय माहिती शेअर केली आहे की नाही यावर एटीएसची पुढील कारवाई अवलंबून असेल.

DRDO Espionage Case  ATS suspected  Another officer to be caught in honeytrap along with Pradeep Kurulkar
Devendra Fadnavis : 'सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीय'; 'द केरळ स्टोरी' पाहिल्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान तपासादरम्यान एटीएसला कुरुलकर प्रकरण आणि गुप्तचर अधिकाऱ्याच्या प्रकरणामध्ये काही संबंध असल्याचे पुरावे अद्याप सापडले नाहीत. मात्र, कुरुलकर यांना हनी ट्रॅप करण्यासाठी वापरण्यात आलेला तोच क्रमांक गुप्तचर विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या बाबतीतही वापरण्यात आल्याचे तपासात आढळून आलं आहे.

DRDO Espionage Case  ATS suspected  Another officer to be caught in honeytrap along with Pradeep Kurulkar
DRDO Espionage Case : पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणारे प्रदीप कुरूलकर यांना १५ मे पर्यंत कोठडी

१५ मे पर्यंत कोठडी

कुरुलकर यांना मंगळवारी एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर प्रदीप कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले आहेत. तसेच भारतीय गुप्तचर यंत्रणेतील (रिसर्च अँड ॲनलिसिस विंग- रॉ) अधिकाऱ्यांकडून कुरुलकरांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com