Pradeep Kurulkar: कुरुलकरांनी डिलीट केलेलं व्हॉट्सॲप ATS ने पुन्हा केलं सुरू; बॅकअप घेताच...

कुरुलकरांच व्हॉट्सॲप अखेर झालं ओपन ATS चॅट वाचण्यासाठी वापरली ही टेक्निक
Pradeep Kurulkar
Pradeep Kurulkaresakal

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेले आणि पाकिस्तानी गुप्तचरांच्या हेरांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून गुप्त माहिती दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याबाबतची आणखी महत्वाची माहिती समोर येत आहे. प्रदीप कुरुलकर यांनी त्यांच्या एका मोबाइलमधील व्हॉट्सॲप ही अ‍ॅप डिलीट केलं असल्याचं समोर आलं आहे.

त्यांचा एक मोबाइल 'डिकोड' करता आला नाही. त्यामुळे एटीएसने तो मोबाइल ताब्यात घेऊन कुरुलकर यांना पासवर्ड घेऊन अनलॉक केला होता. त्या मोबाइलमध्ये कुरुलकर यांचे सीमकार्ड टाकले. या मोबाइलमधील व्हॉट्सॲप अ‍ॅप डिलीट केले असल्याचे दिसून आल्याने एटीएसने पुन्हा ते डाउनलोड करून त्यांच्या नंबरवर व्हॉट्सॲप सुरू केले आणि त्याचा बॅकअप घेतला. त्यातून महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

Pradeep Kurulkar
Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ! 50 आमदार हक्कभंग आणणार

डॉ. प्रदीप कुरुलकर हे गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी मंगळवारी दिले आहेत. त्यानुसार कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून कुरुलकर यांना ४ मे रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत काल (मंगळवारी) संपली. त्यानंतर त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. त्या वेळी सरकार पक्षाकडून गेल्या चौदा दिवसांत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्यात आला.

डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याकडून जप्त केलेल्या मोबाइलचा न्यायवैद्यकीय अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. तसेच, त्यांच्या अन्य एका मोबाइलमधील संवेदनशील माहिती १५ मे रोजी प्राप्त झाली आहे.

Pradeep Kurulkar
Karnataka CM: दोघांच्या भांडणात तिसराच मुख्यमंत्री? काँग्रेस नेता म्हणतो ५० आमदार माझ्या पाठीशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com