सोलापूर जिल्ह्यातील करमाळा एसटी आगारची एसटी बस करमाळा -कर्जत रस्त्यावर रायगाव(ता.करमाळा) जवळ पलटी झाली असून यातील 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. रायगावजवळ वळणावर स्टेअरिगंचा राॅड तुटल्याने ड्रायव्हरचे नियत्रंण सुटले आणि हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.