राज्यावर ड्रोन हल्ल्याचं सावट; अँटी ड्रोन सिस्टीम नसल्यानं चिंता | Drone Attack Possibilities | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anti Drone System

राज्यावर ड्रोन हल्ल्याचं सावट; अँटी ड्रोन सिस्टीम नसल्यानं चिंता

राज्यावर सध्या ड्रोन (Drone Attack) हल्ल्याचं सावट आहे. दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करू शकतील अशी शक्यता काही रीपोर्टमधून समोर आलेल्या माहितीमधून निर्माण झाली आहे. मात्र याबद्दलची धक्कादाय माहिती अशी की, राज्यात ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याचं समोर आलं आहे. या नव्या धोक्यामुळे तपास यंत्रणा हादरल्या आहेत. त्यामुळे राज्याचा गृहविभाग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. (Drone Attack Possibilities)

महाराष्ट्र सायबर सेलचे अधिक्षक यशस्वी यादव यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवावी लागणार आहे. ड्रोन हल्ल्यात 20 किमी ते 30 किमी अंतरावरूनही हल्ला केला जाऊ शकतो. ड्रोनवर स्फोटकं बसवता येतात. याशिवाय, त्यांचा पाठलाग करणेही कठीण आहे. आरोपीने मोबाईल फोन वापरला असेल तर त्याचा आयएमईआय क्रमांकावरून शोध लावला जाऊ शकतो, परंतु ड्रोनला ऑपरेट करता येत नाही. अनेकदा संशयित व्यक्ती डार्क नेट वर sympathizer ड्रोन हल्ला, रासायनिक पदार्थाचा हल्ला करण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचं तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलं आहे.

दरम्यान, यशस्वी यादव यांनी आरोपी, हँकर्स हे डार्क नेटचा वापर बहुतांश करत असतात. या आरोपींना पकडणं कठीणअसतं. कारण हे ते अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर करत असतात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Drone
loading image
go to top