पंचनाम्यांना निवडणुकीचा खोडा

पंचनाम्यांना निवडणुकीचा खोडा

सासवड -  पुरंदर तालुक्‍यात गेल्या बुधवारी (ता. २५) झालेल्या ढगफुटीने सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. निवडणुकीच्या कामामुळे नुकसानाचे पंचनामे आणि त्यासंबंधीचा अहवाल तयार होण्यास विलंब होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

तालुक्‍यातील १०१ महसुली गावांपैकी रानमळा, कोथळे, खळद, सासवड, भिवडी, नारायणपूर, नारायणपेठ, चिव्हेवाडी, कोडीत, चांबळी, केतकावळे, कुंभोशी, देवडी, पानवडी, काळदरी, बहिरवाडी आदींसह २० हून अधिक गावांच्या हद्दीतील शेतजमीन, उभी पिके, घरे, गोठे, जनावरे, वाहने, छोटे पूल, साकव पुरात वाहून गेले आहेत. शेकडो विहिरी गाळाने भरल्या असून अनेक रस्ते खचले आहेत. जादा पाऊस झालेल्या ठिकाणचे डोंगर अथवा टेकड्या खचण्याचा धोका आहे. डोंगरावरील दगड शेतात वाहून आले आहेत. जुने पूल, खचलेले रस्ते, बंधारे, पडझड झालेल्या घरांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे; अन्यथा पुन्हा जोरदार पाऊस झाला तर नुकसानीत पुन्हा भर पडण्याची भीती आहे. 

 तालुक्‍यातील नुकसानाची व्याप्ती 
 वीसहून अधिक गावांना फटका   तीन माणसे, तीस मोठी, तर ५५ लहान जनावरे वाहून गेली   तीनशेहून अधिक विहिरी गाळाने भरल्या   सासवडजवळील पूल खचला,  संगमेश्वरला जाणारा लोखंडी पूल पडला  सुमारे एक हजार एकरातील सुपीक माती वाहून गेली 
 तीन हजार एकरांतील पिकांचे नुकसान   दोन ते तीन बंधारे फुटले
 पंचवीस गावांतील ताली फुटल्या  आठ साकव वा छोटे पूल पडले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com