राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे हे कायदे मागे : संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत

राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे हे कायदे मागे : संजय राऊत

मुंबई : पोटनिवडणुकांमधील पराभव आणि राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे हे कायदे मागे घेतले असतील अशी शंका शिवसेने नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थीत केली. हे कायदे मागे घेण्यात राजकरण आहेच असा दावाही त्यांनी केला.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले,"गेल्या दीड वर्षांपासून काळ्या कायद्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. सरकारची सुरवातीपासून भुमिका आडमुठी होती. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही ही त्यांची भुमिका होती.या काळात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.लखीमपूर खेरी येथे चिरडून मारण्यात आले. लाठ्या काठ्या गोळ्या चालवल्या तरी शेतकरी हटले नाहीत. त्यांना दहशतवादी,खलिस्तानी,पाकिस्तानी उपाध्य दिल्या.

तरीही शेतकरी हटले नाही. अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळे कायदे मागे घ्यावे लागले.यात राजकरण आहेच,पंजाब उत्तर प्रदेशातात भाजपच्या पायखालची वाळू सरकू लागली आहे. शेतकरी आपला पराभव करतील या भितीने कायदे मागे घेतले असावेत. पंतप्रधानांनी देशाचा आवाज ऐकला पहिल्यांदाच मन की बात देशाच्या भावनेशी जोडली गेली.त्यांचे अभिनंदन असा चिमटाही राऊत यांनी काढला.

देशातील विरोधक प्रथमच एकवटले

पोट निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यादा इंधनाचे दर कमी करण्यात आले.आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आग पसरत जाईल या भितीने कायदे मागे घेतले. हि राजकीय पाऊले असले तरी शहाणपण त्यांना सुचले त्याचे कौतूक करायला हवे. शेतकऱ्यांच्या निमीत्ताने पहिल्यादाच देशातील विरोधी पक्ष एकवटले असेही राऊत यांनी नमुद केले.

loading image
go to top