Maharashtra Budget Session : मंत्र्यांची डोकेदुखी वाढली! अतिरिक्त विभागांची जबाबदारी वाढली

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अधिवेशनादरम्यान 'या' मंत्र्यांना सांभाळावं लागणार अतिरिक्त विभागाचं कामकाज
Maharashtra Budget Session
Maharashtra Budget SessionEsakal

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (27 फेब्रुवारी) सुरु होणार आहे. आज अधिवेशनाची सुरवात राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने होणार आहे. दरम्यान, अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे मूळ विभागासोबत अतिरिक्त विभागाचे कामकाज अधिवेशनादरम्यान काही मंत्र्यांना सांभाळावं लागणार आहे.

Maharashtra Budget Session
Maharashtra Assembly Budget Session 2023 2024: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला नाही. आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अधिवेशनादरम्यान काही मंत्र्यांना मूळ विभागासोबतच अतिरिक्त विभागाचे कामकाज पहावे लागणार आहे. या संदर्भातील पत्र शिवसेनेने (शिंदे गट) विधानपरिषद उपसभापतींना दिलं आहे.

Maharashtra Budget Session
‘RTE’ प्रवेश १ मार्चनंतर! १,०१,८८१ विद्यार्थ्यांना मिळणार नामवंत इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश

कोणते मंत्री कोणत्या विभागाचं काम पाहणार ?

माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास : उदय सामंत

सार्वजनिक बांधकाम : शंभूराज देसाई

मृदू व जनसंधारण : दादा भुसे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य : संजय राठोड

मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन : तानाजी सावंत

अल्पसंख्यांक विकास : अब्दुल सत्तार

पर्यावरण व वातावरणीय बदल : दीपक केसरकर

माहिती व जनसंपर्क : संदीपान भुमरे

सामान्य प्रशासन, परिवहन : गुलाबराव पाटील

Maharashtra Budget Session
कांदा लिलाव १३, १४ अन्‌ १५ जानेवारीला बंद! प्रतिक्विंटल सरासरी १४०० तर उच्चांकी दर २५०० रुपये

ज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विरोधकांनी काल सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असून ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहावं लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com