esakal | भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची कबूली; मुख्यमंत्री पदाचा शिवसेनेला दिला होता शब्द 
sakal

बोलून बातमी शोधा

dev.jpg

मुख्यमंत्री पदावरुन भाजपा व शिवसेनेचं चांगलच बिनसलं आहे. तर, मी खोटं बोलत नसून सत्य जनेतला माहिती आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाकडून फसवणूक होत असल्याचा आरोप केला होता. 

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची कबूली; मुख्यमंत्री पदाचा शिवसेनेला दिला होता शब्द 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सध्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधील वाद अतिशय टोकाला गेला आहे. मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर झाले आहेत. रविवारी भाजपने शिवसेनेची एनडीएमधून हकालपट्टी केली आहे. यामुळे वाद आणखीच वाढला आहे. यातच भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची आॅफर दिली होती असे, सांगितले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.  

दरम्यान, मुख्यमंत्री पदावरुन भाजपा व शिवसेनेचं चांगलच बिनसलं आहे. तर, मी खोटं बोलत नसून सत्य जनेतला माहिती आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाकडून फसवणूक होत असल्याचा आरोप केला होता. 

पद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप या निकषावर महायुतीकडून निवडणुका लढविण्यात आल्या आहेत. पण, मुख्यमंत्रीपदावरुन या दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना आणि भाजपाची गेल्या 25 वर्षांपासूनची युती मुख्यमंत्रीपदामुळे संपुष्टात आल्याचं दिसून येत आहे. 

एनडीएमधून शिवसेनेला बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे सेना खासदारांची आसन व्यवस्थाही बदलण्यात आली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन राज्यात महाशिवआघाडी स्थापन होणार असल्याचं दिसून येतंय. 

शिवसेनेचाच मुख्यमंत्री या धोरणानुसार हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन भाजपाला दूर ठेवणार आहेत. मात्र, शिवसेना-भाजपामध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वीच वादाची ठिणगी पडली होती. त्यावेळी, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हा वाद संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता, असे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलंय. लोकसभेत भाजपासोबत युती करण्यासाठी शिवसेनेनं भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाची अट घातली होती. मुख्यमंत्रीपद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. 

त्यावेळी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहांना मध्यरात्री 2 वाजता फोन करुन चर्चा केली होती. तसेच, युती तुटली तर? असा प्रश्नही विचारला होता. अमित शहांसह भाजपाचे काही नेते सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास इच्छुक नव्हते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युती तोडण्यास तयार नव्हते. त्यामुळेच अमित शहा स्वत: मातोश्रीवर आले होते. 

अमित शहा मातोश्रीवर आल्यानंतर शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये बंद खोलीत चर्चा झाली होती. या चर्चेवेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते, असेही भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलंय, असे वृत्त हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी वेबसाईटने दिले आहे. 

loading image
go to top