किरीट सोमय्यांच्या 'रावणा'वर पोलिसांची धडक कारवाई I Kirit Somaiya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

भाजपनं दसऱ्यानिमित्त महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचं दहन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

Dussehra 2021 : किरीट सोमय्यांच्या 'रावणा'वर पोलिसांची धडक कारवाई

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : भाजपनं दसऱ्यानिमित्त महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) घोटाळ्यांचं दहन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मविआ सरकार आणि विशेषतः अजित पवारांच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत सातत्यानं पाठपुरावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र, मुलूंडमध्ये किरीट सोमय्या यांनी उभारलेला 'भ्रष्टाचाररुपी रावण' पोलिसांनी हटवला असून संबंधितांवर कारवाई सुरु केलीय. दरम्यान, भाजप नेते सोमय्या आणि पोलिसांत कारवाईवेळी बाचाबाची झाल्याची माहिती मिळतेय.

महाराष्ट्रातील घोटाळेबाज सरकारचा निषेध करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन भाजपकडून करण्यात आलं होतं. भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध आवाज उठवला जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर अजित पवार यांची आणि त्यांच्याशी संबंधित सर्वांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. गेल्या सलग सात दिवसांपासून अजित पवारांशी संबंधित अनेकांच्या कार्यालयांवर धाडी पडत असून आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय.

हेही वाचा: चिंताजनक! भारतात उपासमारी वाढली; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानची स्थिती चांगली

आज मुलूंडमध्ये सोमय्या यांनी उभारलेल्या 'भ्रष्टाचाररुपी रावण'चं भाजपकडून दहन करण्यात येणार होतं. मात्र, या कार्यक्रमाबद्दल सोमय्यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे कारण देत पोलीस व पालिकेनं मुलूंडमधील 'भ्रष्टाचाररुपी रावणा'चं पोस्टर हटवलंय. सोमय्या यांनी राज्य सरकारविरोधात हे पोस्टर उभारलं होतं. मात्र, कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केलीय. दरम्यान, कारवाईवेळी सोमय्या आणि पोलिसांत बाचाबाची पहायला मिळाली.

loading image
go to top