'भाजप नेत्यांना पायऱ्यांवर पाहून आमचे दिवस आठवले, ओरडून घसा कोरडा व्हायचा'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

माळेगावच्या सर्व सभासदांचे अभिनंदन
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर अजित पवार म्हणाले, की माळेगाव साखर कारखाना पाच वर्षापूर्वी आमच्या हातातून गेला, आता पुन्हा आमच्या विचारांचे लोक तिथे निवडून आलेत आहेत. मी सर्व सभासदांचे अभिनंदन करतो.

मुंबई : विरोधात असलेल्या भाजप नेत्यांनी काल (सोमवार) विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून आंदोलन केले. तेव्हा मला आमचे दिवस आठवले, ओरडून घसा कोरडा व्हायचा. मग कोणी गोळी द्यायचे तर कोणी काही तरी द्यायचे. पण आता आमचे सरकार असे काम करेल की त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

काल विरोधी पक्षांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याला अजित पवार यांनी आज उत्तर दिले. 

अजित पवार म्हणाले, की खरं तर भाजपाने आंदोलन करण्याची गरज नव्हती. कालच आम्ही कर्जमाफी योजना जाहीर केली आहे.अर्थसंकल्पही जवळ येतोय. त्यात शेतकर्‍यांना देण्याचा प्रयत्न असेल. विरोधी पक्षात असलं की जनतेसाठी काही तरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आम्हीही हे करायचो. माझी विनंती आहे त्यांना जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले तर त्यातून प्रश्न सुटतील

माळेगावच्या सर्व सभासदांचे अभिनंदन
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर अजित पवार म्हणाले, की माळेगाव साखर कारखाना पाच वर्षापूर्वी आमच्या हातातून गेला, आता पुन्हा आमच्या विचारांचे लोक तिथे निवडून आलेत आहेत. मी सर्व सभासदांचे अभिनंदन करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DY CM Ajit Pawar statement about BJP leaders agitation in Vidhanbhawan