ESakal : ‘ई-सकाळ’ची २५ वर्षे दमदार घोडदौड; विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांकडून दाद, नवी दिशा देणारे माध्यम
25 Years Of ESakal : दैनिक सकाळ’च्या ई-सकाळ संकेतस्थळाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्याला दाद दिली.
पुणे : वृत्तपत्र क्षेत्रात ९३ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या ‘दैनिक सकाळ’चे महत्त्वाचे डिजिटल अंग म्हणजेच ई-सकाळ. या संकेतस्थळाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली.