सोलापुरातील पहाटेची घटना! आजोबा गेले दुध आणायला, आजीबाई किराणा दुकानात सफाई करुन घरात गेल्या, मागून घरात शिरला तरुण, गळ्याला लावला चाकू अन्‌...

सोलापुरातील शिवगंगानगर भाग-चार, मजरेवाडी परिसरातील आजीबाईच्या गळ्याला चाकू लावून चोरट्याने ७८ हजारांचे १३ ग्रॅमचे मिनी गंठण हिसकावून नेले. आजीबाईचे त्या भागात किराणा दुकान आहे. ही घटना गुरुवारी (ता.९) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. जयश्री अरुण केत (वय ७२) असे त्या आजीबाईचे नाव आहे.
Solapur Crime
Solapur Crimeesakal
Updated on

सोलापूर : सोलापूर शहरातील शिवगंगानगर भाग-चार, मजरेवाडी परिसरातील आजीबाईच्या गळ्याला चाकू लावून चोरट्याने ७८ हजारांचे १३ ग्रॅमचे मिनी गंठण हिसकावून नेले. आजीबाईचे त्या भागात किराणा दुकान आहे. ही घटना गुरुवारी (ता.९) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. जयश्री अरुण केत (वय ७२) असे त्या आजीबाईचे नाव आहे.

गुरुवारी पहाटे साडेपाच्या सुमारास आजीबाई जयश्री व त्यांचे पती अरुण केत दोघेही उठले होते. दुकान उघडण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. अरुण केत दूध आणायला बाहेर गेले होते. त्यावेळी आजीबाईंनी दुकानाची साफसफाई केली आणि शटर खाली ओढून त्या घरात निघाल्या. तेव्हा त्यांच्या मागून एक २५ ते ३० वर्षीय तरुण आला. त्याच्या तोंडाला काळे कापड बांधले होते, त्याच्या अंगात फूल लाल कोट होता. तो आजीबाईच्या मागून घरात शिरला.

अनोळखी तरुण घरात शिरल्याने आजीबाई आरडाओरड करू लागल्या. चोरट्याने आजीबाईचे तोंड हातातील ओढणीने दाबण्याचा प्रयत्न केला. आजीबाईने जोरात प्रतिकार केला, त्यावेळी चाकूचा धाक दाखविला. मारण्याची भीती दाखवून गळ्यातील मिनी गंठण हिसकावले आणि तो तरुण पसार झाला. या प्रकरणी जयश्री केत यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली.

आजीबाई धीट, पोलिस उपायुक्तांची भेट

७२ वर्षांच्या आजीबाई धीट होत्या, त्यांचा प्रतिकार पाहून चोरटा फक्त गळ्यातील मिनी गंठण घेऊन पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव असे अधिकारीही होते. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिस चोरट्याच्या वर्णनावरुन शोध घेत आहेत. दरम्यान, आजीबाईला तीन मुले असून एक मुलगा सोलापुरात, दुसरा पुण्यात आणि एकजण परदेशात अभियंता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com