
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर विरोधकांनी, विशेषतः काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असला तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व आरोप फेटाळले आहेत. राज्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कायदेशीररित्याच पार पडली असल्याचा दावा आयोगाने केला आहे. तसेच, मतदानानंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून कोणतीही तक्रार अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निरीक्षकांकडे नोंदवण्यात आलेली नसल्याचे आयोगाने स्पष्ट करत काँग्रेसची कोंडी केली आहे.