तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना टार्गेट केलं जातंय : नारायण राणे

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नेत्यांना बदनाम करणे एजन्सीचे काम

तपास संस्था कोणासाठी काम करतात की, पैशासाठी काम करतात हे मी सांगू शकत नाहीत. मात्र, नेत्यांना बदनाम करण्यासाठी एजन्सी काम करत आहेत, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. 

मुंबई : सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांसारख्या संस्थांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपवर निशाणा साधला. ''तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना टार्गेट केलं जात आहे'', असे नारायण राणे म्हणाले. 

गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआयकडून अनेक नेत्यांवर कारवाई केली जात आहे. त्यावर नारायण राणे यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचे असल्यास यासाठी काही एजन्सी काम करत आहेत. मी त्या एजन्सीच्या म्होरक्यांना पकडले. त्यांना मी विचारले की असे का करत आहात, तेव्हा त्यांनी काही जणांच्या आदेशावरून असे करावे लागत आहे, असे सांगितले.

...वेळ आल्यावर सांगेन

सात-एक लोकांची टीम आहे. त्यामध्ये काही वकिलांचा समावेशही आहे. काही सीएही आहेत. भुजबळांचाही त्याच टीमने बळी घेण्याचा प्रयत्न केला होता. ती टीम कसे काम करते आणि ते विरोधकांना कसे 'ब्लॅकमेल' करत आहेत. हे वेळ आल्यावर सांगेन.  

नेत्यांना बदनाम करणे एजन्सीचे काम

तपास संस्था कोणासाठी काम करतात की, पैशासाठी काम करतात हे मी सांगू शकत नाहीत. मात्र, नेत्यांना बदनाम करण्यासाठी एजन्सी काम करत आहेत, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED and CBI is targeting opposition parties with instruction of BJP says Narayan Rane