संजय राऊतांना ईडीचं दुसरं समन्स, 'या' तारखेला राहणार हजर |n Sanjay Raut Received ED Summons | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Received ED Summons

संजय राऊतांना ईडीचं दुसरं समन्स, 'या' तारखेला राहणार हजर

संजय राऊत यांना ईडीने सोमवारी समन्स (Sanjay Raut summoned by ED) बजावलं होतं. 28 जूनला म्हणजे आज चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीने दिले होते. मात्र, राऊतांनी वकीलामार्फत वेळ मागितला. त्यावर कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे.

हेही वाचा: आठवडाभरानंतर एकनाथ शिंदे माध्यमांसमोर; म्हणाले, "मी शिवसेनेतच, हिंदुत्व पुढे नेणार"

पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या. मात्र, आज अलिबागमधील आपल्या आयोजित सभेमुळे संजय राऊत या चौकशीला हजर राहू शकले नाहीत.

इडीने राऊतांना तुर्तास वेळ दिला असून १ जुलै रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

संजय राऊत यांचे वकील वेळ मागण्यासाठी ईडीच्या कार्यालयात गेले होते. कार्यालयातून बाहेर आल्यावर त्यांनी याबाबतची माहिती दिली. संजय राऊत यांचे वकील विकास यांनी म्हटलं की ईडीने काल संजय राऊत यांना समन्स बजावलं होतं. मात्र, ते संजय राऊत यांना खूप उशिराने मिळालं.

हेही वाचा: 'नावं सांगा...', हॉटेलच्या आवारातूनच शिंदेंनी अदित्य ठाकरेंना दिलं आव्हान!

ईडीने काही कागदपत्रही मागवले होते. मात्र, इतक्या कमी वेळात ही कागदपत्र जमा करणं कठीण होतं. त्यामुळे आम्ही ईडीकडे वेळ मागितला. यासाठी ईडीने वेळ वाढवून दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं. समोर आलेल्या माहितीनुसार आता ईडीने संजय राऊत यांना 1 जुलैला चौकशीसाठी बोलावलं आहे

Web Title: Ed Gave 14 Days Time To Sanjay Raut In Land Scam Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top