तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे 'ईडी'च्या कार्यालयाबाहेर

टीम ई-सकाळ
Thursday, 22 August 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयातून आता बाहेर आले आहेत. सकाळी अकरा वाजता त्यांच्या चौकशीला सुरवात झाली होती. तब्बल नऊ तासांनंतर त्यांची सुटका झाली.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयातून आता बाहेर आले आहेत. सकाळी अकरा वाजता त्यांच्या चौकशीला सुरवात झाली होती. तब्बल नऊ तासांनंतर त्यांची सुटका झाली.

'कोहिनूर' प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलविण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र, आज त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्मिला, त्यांची मुलगी उर्वशी आणि मुलगा अमित ठाकरे यांनाही चौकशीसाठी नेण्यात आले होते. 

दरम्यान, राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याचे समजल्यानंतर काल रात्रीपासूनच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED Inquiry Completed of Raj Thackeray now leave From ED Office