वसुली प्रकरण : अनिल देशमुख यांच्या घरी ED चा छापा

Anil Deshmukh
Anil DeshmukhFile photo
Updated on

नागपूर : १०० कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former home minister anil deshmukh) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली असून आज सकाळपासून ही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीसोबत केंद्रीय सुरक्षा पथक देखील दाखल झाले आहेत. (ED raided on former home minister anil deshmukh house in nagpur)

Anil Deshmukh
अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षेचे सूत्र निश्‍चित

गुरुवारी रात्रीच मुंबईहून ईडीचे पथक नागपुरात आले. शुक्रवारी सकाळीच स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे छापा टाकला. अनिल देशमुख यांच्या घराच्या तिनंही बाजूने CRPF ची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. २० पेक्षा जास्त बंदूकधारी CRPF चे जवान याठिकाणी तैनात आहेत. सध्या अनिल देशमुख नागपुरातील घरी उपस्थित नसून देशमुख यांची पत्नी आणि इतर सदस्य घरी आहेत.

सीबीआयकडून 11 तास चौकशी

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने (CBI) 21 एप्रिल रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर छापा टाकून सलग 11 तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.

दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच अनिल देशमुख हे काही दिवसानंतर तुरुंगात असतील, असाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com