esakal | अनिल परबांच्या अडचणीत वाढ, खरमाटेंना ईडीची नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल परबांच्या अडचणीत वाढ, खरमाटेंना ईडीची नोटीस

अनिल परबांच्या अडचणीत वाढ, खरमाटेंना ईडीची नोटीस

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रकरणी नोटीस बजावली आहे. अनिस परब यांचे विश्वासू आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीने सोमवारी, 6 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावलं आहे. बजरंग खरमाटे यांनी ईडीने बजावलेली पहिलं समन्स आहे. यापूर्वी अनिल परब यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने नोटीस बजावले होते. आता अनिल परब यांचे जवळचे सहाय्यक यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे अनिल पराब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.

30 ऑगस्ट रोजी ईडीने बजरंग खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर छापेमारी केली होती. खरमाटे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला आहे. ईडीने काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचेही सांगितले जात आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली होती. नोटीसनुसार त्यांना मंगळवारी (ता. ३१) ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे होते. मात्र, अनिल परब उपस्थित झाले नाही. मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने काही ठरलेली कामे आहेत. त्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असे अनिल परब यांनी ईडी कार्यालयात कळवले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमध्ये अनिल परब भूमिका बजावत असल्याचे एका व्हिडीओमधून दिसले होते. तेव्हापासूनच, अनिल परब यांना टार्गेट करण्यात येईल, अशी चर्चा होती. त्यानंतर आधी अनिल परब यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांचे विश्वासू बजरंग खरमाटे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

आधी संजय राठोड गेले, मग गृहमंत्री अनिल देशमुख गेले. आता अनिल परब यांचा नंबर आहे. महाविकासआघाडीमधील मंत्र्यांची आणखी मोठी लिस्ट आहे. रांगेने एक एक मंत्री आहे. काही जणं सुपात आहे काही जात्यात आहेत.

loading image
go to top