Patra Chawl Case : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचा समन्स

ED summons shivsena leader Sanjay Raut wife Varsha Raut in Patra Chawl case
ED summons shivsena leader Sanjay Raut wife Varsha Raut in Patra Chawl case

मुंबई : पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असताना संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील मंनी लॉंड्रींग प्रकरणात समन्स पाठवण्यात आला आहे.

पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत, आज संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे, यादरम्याना पत्रा चाळ जमीन प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने आज समन्स बजावला आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यावर काही व्यवहार उघडकीस आल्यानंतर ईडीने त्यांच्या नावे समन्स जारी केले आहे

दरम्यान संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली असून त्यांना पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए कोर्टात हजर केलं असता त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली त्यानंतर आज ही कोठडी संपल्याने राऊत यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com