
छत्रपती संभाजीनगर : राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी यंदा केंद्र संचालक, पर्यवेक्षकांपासून शिपायापर्यंत सर्वांच्याच परीक्षा केंद्रांची अदलाबदली करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.