
मुंबई : तब्बल दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील विद्यापीठ (Universities), त्या अंतर्गत येणारी महाविद्यालये (colleges starts) आज, बुधवारी, 20 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत. यासाठी महाविद्यालयांनी जोरदार तयारी केली असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागाकडून (Education Authorities) देण्यात आली. मुंबई आणि परिसरात अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी (Students welcoming) जोरदार तयारी केली आहे. अनेक ठिकाणी रांगोळ्या काढून तर काही ठिकाणी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्याचे स्वागत केले जाणार असल्याचे प्राचार्य संघटनेच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.
आजपासून सुरू राज्यात प्रामुख्याने सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांना आपल्या वर्गात उपस्थित राहता येणार आहे. तर ज्यांनी एकही डोस घेतलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.तर कोविड-१९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामांच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना मानक कार्य प्रणाली (एसओपी) तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना सर्वच महाविद्यालयात लागू असणार आहेत.
मुंबई विद्यापीठा च्या अंतर्गत येणारी सर्व 738 महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या कालिना आणि फोर्ट संकुलातील सर्व विभागही सुरू होणार असून यासाठी सर्व प्रकारचीं काळजी घेण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. वर्षात अनेक विद्यार्थ्याचे अभ्यासक्रम हे पूर्ण झाले असून त्यांच्यातील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील असे नाही, मात्र प्रथम वर्षातील दोन डोस घेतलेले विद्यार्थी उपस्थित राहतील. त्यांना आम्ही सरकारने जाहीर केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमावली याचे पालन करून आम्ही महाविद्यालय, सुरू करणार असल्याचे साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.आर. राजवाडे यांनी सांगितले. मुंबई. आणि परिसरातील वरिष्ठ महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थांचे आम्ही स्वागत करणार आहोत.आमच्याकडे आलेल्या शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्गांचे लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे वरिष्ठ महाविद्यालय संस्थाचालक संघटनेचे प्रमुख व माजी प्राचार्य बी.वी. प्रधान यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.