घरी बसून ‘असा’ करा अभ्यास; ३२५ पानात तीन महिन्याचा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम

अशोक मुरुमकर
Monday, 22 June 2020

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यासाठी ‘शैक्षणिक दिनदर्शिका’ तयार केली आहे. पीडीएफ स्वरुपात ही दिनदर्शिका असून वर्गावर क्लिक केल्यानंतर काय अभ्यास करायचे हे दिसत आहे.

सोलापूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यासाठी ‘शैक्षणिक दिनदर्शिका’ तयार केली आहे. पीडीएफ स्वरुपात ही दिनदर्शिका असून वर्गावर क्लिक केल्यानंतर काय अभ्यास करायचे हे दिसत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही शैक्षणिक दिनदर्शिक पोचावी म्हणून सोशल मीडियावर व्हारल केली आहे.
जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा सर्व घटकांवर परिणाम झाला आहे. त्याला शिक्षण विभाग सुद्धा अपवाद राहिलेला नाही. जगभरातील शाळा व महाविद्यालये अनिश्‍चित काळासाठी बंद आहेत. विद्यार्थी, पालक व शिक्षक शाळा कधी सुरु होणार, अभ्यासक्रमाचे काय होणार या विचारात आहेत. मात्र, २०२०- २१ या शैक्षणिक वर्षात नुकसान होऊ नये म्हणून दीक्षा ॲप, रेडिओ, टिव्हीच्या माध्यमातून धडे देण्याचा प्रयत्न करत आहे. यातूनच तंत्रस्नेही शिक्षक समुहाने पुढाकार घेऊन ‘शैक्षणिक दिनदर्शिका’ बनवली आहे. शैक्षणिक दिनदर्शिका ही ३२५ पानांची स्मार्ट पीडीएफ स्वरुपात आहे. याला फक्त डाऊनलोड करेपर्यंत इंटरनेटची आवश्‍यकता लागत आहे. सध्या अनेक व्हॉट्‌सअपगृपवर ही दिनदर्शिका आली आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रात डिजीटल शिक्षण सुरु करण्याबाबत रेंज येत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही स्मार्ट पीडीएफ स्वरुपातील दिनदर्शिकेवर ज्या भागाचा अभ्यास करायचा आहे तिथे क्लिक केल्यानंतर व्हिडीओ ओपन होतो. डाऊनलोडही करता येतो. त्यामुळे पुन्हा- पुन्हा तो व्हिडीओ पाहता येत आहे. राज्यातील सर्व पालक व विद्यार्थी हे सहजपणे वापरु शकतील, असे सांगण्यात येत आहे. शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही दिनदर्शिका वापरावी अशी सूचना करण्यात आली आहे. शिक्षकांनी फोन व्हॉट्‌सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. केवळ शैक्षणिक दिनदर्शिका पुरवल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होणार नाही. शिक्षकांनी सतत विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना काही प्रश्‍न विचारुन सर्वंकष मुल्यमापन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

ऑनलाईनचा मारा योग्य नाही
विद्यार्थ्यांवर सतत ऑनलाइन चाचण्यांचा मारा करणे योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना लेखी गृहपाठ, स्वाध्याय आणि चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांचे अध्यायन कंटाळवणे होणार नाही, याचीही दक्षता घ्या असे शिक्षकांना शैक्षणिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

शिक्षकांसाठी दिलेल्या काही सूचना
- शैक्षणिक दिनदर्शिका सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यत पोहचवावी
- शैक्षणिक दिनदर्शिका वापरण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांशी व्हिडीओ कॉल, ग्रुप कॉल, कॉन्फरन्स कॉलवरुन संवाद साधावा.
- वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना फक्त अभ्यासबद्दल बालू नये. हा संवाद अनौपचारिक असावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Educational Calendar for Maharashtra State Council for Educational Research and Training