- अविनाश साबापुरे
यवतमाळ - दहावी-बारावीच्या परीक्षेतून नातवंडे मोकळी होताच आता घरातील निरक्षर आजी-आजोबांची परीक्षा होणार आहे. नव भारत साक्षरता कार्यक्रमातून शिक्षणाचे धडे गिरविणार्या या प्रौढांची येत्या रविवारी (ता.23) प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातून तब्बल आठ लाख प्रौढ या परीक्षेला बसणार आहेत.