
Eknath Khadse :...तर मुख्यमंत्रीपदासाठी गिरीश महाजन यांना पाठिंबा; कट्टर विरोधक खडसेंचं विधान
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजपनेते गिरीश महाजन एकमेकांचं कट्टर विरोधक आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे. खडसे यांनी थेट महाजन यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दर्शविला आहे. (Eknath Khadse news in Marathi)
खडसे म्हणाले की, सुरेशदादा जैन हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री कार्यक्षम असावा, दुरदृष्टी असावी, या निकषात बसणारा माणूस हवाय. या निकषात गिरीशभाऊ बसत असतील तर माझा त्यांना पाठिंबा आहे. मला त्यांची काहीही अडचण नाही.
या भागातील प्रकल्प मंजुर करण्यासाठी जे तयार असतील त्यांना माझा पाठिंबा राहिल. मला आनंद होईल की, सिंचनासाठी पाणी हवयं, खांदेशच्या सिंचनासाठी पैसा मिळाला तर मला आनंद होईल, असंही खडसे यांनी म्हटलं.
एकनाथ खडसे यांनी भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महाजन आणि खडसे आमने-सामने आले आहेत. मात्र खडसे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी महजान यांना पाठिंबा दर्शविल्याने चर्चांना उधाण आलं आहे.