आषाढीला यंदा आमचा पांडुरंगच सोबत नाही: खडसे

बुधवार, 4 जुलै 2018

राजकारणात भाऊसाहेबांचा व माझा सतत लपंडाव चालत असल्याचे खडसे म्हणाले. कधी ते सत्तेत असतील तर मी नसायचो. मी असलो तर ते नसायचे. पण आता पंढरपुरच्या आषाढी वारीला जाताना पहिल्यांदाच हा लंपडाव होत असल्याची खंत आहे. अशी भावना खडसे यांनी व्यक्त केली.

नागपूर : ‘गेली कित्येक वर्षे मी मुक्ताईनगरहून तर ते मेहकरवरून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात असत. त्यांचे कुटूंब व माझे कुटूंब एकत्रच आषाढीला जायचा हा पायंडा पडला होता. पण यंदा आषाढी जवळ आली आहे. पण आमचा पांडुरंगचं आज आमच्यासोबत नाही.’ अशा भावनिक शब्दात भाजपचे जेष्ट नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत भावना व्यक्त केल्या. 

आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत दिवंगत कृषी मंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब यांच्या शोकप्रस्तावावर चर्चा करण्यात आली. फुंडकर व खडसे यांचे मागील पंचेचाळीस वर्षाचे राजकिय व कौंटुबिक संबध होते. यावर खडसे यांनी अनेक किस्से सांगत आठवणींना उजाळा दिला. 

राजकारणात भाऊसाहेबांचा व माझा सतत लपंडाव चालत असल्याचे खडसे म्हणाले. कधी ते सत्तेत असतील तर मी नसायचो. मी असलो तर ते नसायचे. पण आता पंढरपुरच्या आषाढी वारीला जाताना पहिल्यांदाच हा लंपडाव होत असल्याची खंत आहे. अशी भावना खडसे यांनी व्यक्त केली.

ओबीसी चळवळीतली त्यांची उणीव कायम राहील असे म्हणत खडसे यांनी फुंडकर यांना विधानसभेत श्रध्दांजली वाहिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse talked about Pandurang Fundkar