esakal | खडसेंचा सरकारला घरचा आहेर; कुपोषणाचे सर्वाधिक बळी युतीच्या काळात
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse

किमान आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात गेले आहेत. पहारेकऱ्यांच्या वेतनाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कधी करणार हे सरकारने सांगावे. पहारेकऱ्यांच्या कामाच्या वेळेत कपात करून ती 8 तास करावी. 

खडसेंचा सरकारला घरचा आहेर; कुपोषणाचे सर्वाधिक बळी युतीच्या काळात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीच केली जात नाही. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात झाले आहेत, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

एकनाथ खडसे यांच्या सरकारवरील टीकेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग दहा दिवसांत लागू करणार असे सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान खडसेंनी आदिवासी विद्यार्थी, पहारेकऱ्यांचे वेतन आणि कुपोषणाच्या सरकारला घरचा आहेर दिला. 

खडसे म्हणाले, की किमान आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात गेले आहेत. पहारेकऱ्यांच्या वेतनाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कधी करणार हे सरकारने सांगावे. पहारेकऱ्यांच्या कामाच्या वेळेत कपात करून ती 8 तास करावी. 

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी योजना राबवताना 103 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांच्या निलंबनाची घोषणा विधानसभेत पणन व वस्त्रोद्योगमंत्री राम शिंदे यांनी केली.

loading image
go to top