esakal | एकनाथ खडसेंच्या जावयाचा जामीन ईडीने फेटाळला
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse

एकनाथ खडसेंच्या जावयाचा जामीन ईडीने फेटाळला

sakal_logo
By
सुधीर काकडे

राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाख खडसे (Eknath Khadase) सध्या ईडीच्या रडारवर आहे. खडसे यांच्या सोबतच त्यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Choudhary) यांची सुद्धा ईडीकडून (ED) चौकशी सुरु आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी गिरीश चौधरींना ईडीने अटक केली होती. त्यातच आता ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाचा जामीन फेटाळला. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी गिरीश चौधरींना ईडीने अटक केली होती.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता. परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.

हेही वाचा: "चोराच्या उलट्या बोंबा"; नाना पटोलेंचा फडणवीसांवर निशाणा

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपुर्वी 'मी पक्ष बदलला म्हणून `ईडी`ची चौकशी (ED Inquiry) लावून मला विनाकारण त्रास दिला. मला बदनाम केले तरी मी झुकणार नाही आणि घाबरणार ही नाही असा खणखणीत इशारा यांनी भाजपला (BJP) दिला आहे. पुढे बोलताना खडसे असेही म्हणाले की, ज्याने भ्रष्टाचार केला त्याला कायद्याने शिक्षा व्हायला हे आपले मत आहे. परंतु ज्या माणसाच्या चार वेळा चौकश्या झाल्या आहेत, लाचलुचपत विभाग,इन्कम टॅक्स विभाग यांनी चौकश्या केल्या त्यात त्यांना काहीही आढळले नाही.तरी आपली ईडी मार्फत चौकशी करून विनाकारण छळ केला जात आहे. आपल्या चौकशीचे निव्वळ राजकारण केले जात आहे हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे.मला कितीही त्रास दिला तरी मी थांबणार नाही, विरोधकांना काय वाटेल ते वाटेल ' मी पुन्हा येईल ' असे म्हणत त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

loading image
go to top