राजधानी दिल्लीत काय खलबतं झाली; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजधानी दिल्लीत काय खलबतं झाली; शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

राजधानी दिल्लीत काय खलबतं झाली; शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : राज्यात नव्याने अस्तित्त्वात आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचा अद्यापपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यात काल एकनाथ शिंदे आणि फडणवीस दिल्लीत गेले होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या तरी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना काहीसा ब्रेक लागला आहे.

हेही वाचा: जगाची भूक भागवणार रशिया-युक्रेनमधील 'मिरर डील' करार; महागाईला लागणार ब्रेक

शिंदे म्हणाले की, देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मूर्म यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील प्रमुख नेत्यांना स्हेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. त्यासाठी आपण स्वतः आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत गेलो होतो. दिल्लीतील कार्यक्रम हा स्नेहभोजनाचा होता. त्यामुळे तेथे पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक वरीष्ठ नेते उपस्थित होते मात्र, तेथे राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत कोणत्याही चर्चेचे किंवा बैठक झालेली नसून लवकरच राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे म्हटले आहे.

हेही वाचा: ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार; महत्त्वाच्या प्रकरणांचा CBI करणार तपास

ठाकरे सरकारच्या काळात देण्यात आलेल्या अनेक कामांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, राज्यात ठाकरे सरकारने घाई गडबडीत जे काही 400 जीआर काढले होते त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील विकास कामांना कोणत्याही प्रकारची स्थगिती देण्यात आलेली नसल्याचेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेना नेमकी याबाबतचे पुरावे 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करण्यास सांगणण्यात आले आहे. त्यानुसार योग्य ते पुरावे सादर करणार आहे.

काय म्हणाले शंभुराज देसाई

दरम्यान, शिवसेना नेमकी कुणाची याबाबत निवडणूक आयोगाने मागितलेली कागदपत्रे आणि बहुमताचे पुरावे आम्ही मुदतीत नक्कीच सादर करू. तसेच निवडणूक आयोग आणि कायद्यावर आमचा विश्वास असल्याचे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.

Web Title: Eknath Shinde And Devendra Fadanvis Return From Delhi Know What He Say About Cabinet Expansion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top