Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा कारभार फक्त एक वर्षाचा; जयंत पाटलांचं सूचक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा कारभार फक्त एक वर्षाचा; जयंत पाटलांचं सूचक विधान

शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारला धक्का दिला होता. ४० आमदार सोबत घेवून शिंदे गुहाटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून भाजप सोबत जात नवं सरकार स्थापन केलं, आणि एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना देखील तो मोठा धक्का होता. त्यानंतर शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आलेले निर्णय रद्द करण्यात आले.

त्यामुळे महाविकास आघाडी आणि शिंदे यांच्यात सारखी खडाजंगी पाहिला मिळते. बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. पाटील म्हणाले " बंडखोरांच्या मतदार संघात फिरून आल्यानंतर समजते की त्यांच्या विरोधात लोकांच्या मनात किती रोष आहे.

लोक त्यांना नक्कीच धडा शिकवतील त्यांचे डिपॉझिट जप्त होईल. महाविकास आघाडीने लोकांच्या हितासाठी सगळे निर्णय घेतले.

हेही वाचा: तुम्ही तुमचं पाहा, आम्ही शिंदेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे; बावनकुळेंचा पटोलेंना टोला

महाविकास आघाडीच्या कामांची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली आहेत. शेतकरी कर्ज माफीचा निर्णय सगळ्यात आधी आम्ही घेतला. कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचं देशभरात कौतुक झालं. पुढे पाटील म्हणाले "ज्याला मुख्यमंत्री व्हायचे होते त्याला उपमुख्यमंत्री केले आणि ज्याला उपमुख्यमंत्री व्हायचे होते त्याला मुख्यमंत्री केले. परंतु त्यांचा कारभार फक्त एका वर्षाचा आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीत कमीपणा घ्यावा लागत आहे." असं मत जयंत पाटलांनी केलं.