
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. राज्यातील बैठकांमुळे शिंदे यांचा दौरा रद्द झाला आहे. मुंबईतील आजच्या बैठका टाळणे कठिण असल्याने हा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच हा दौरा उद्या होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं आहे. (Eknath Shinde delhi tour cancel news in Marathi)
हेही वाचा: मी काय करतो ठावूक आहे का? चिमुरडीने उत्तर देताच मोदीही खळखळून हसले...
मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लांबला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आज नियोजित होता. याआधी एकनाथ शिंदे ५ वेळा दिल्लीला जावून आले आहेत. आजचा त्यांचा सहावा दिल्ली दौरा होता. आता शिंदे उद्या दिल्लीला जावू शकतात असं सांगण्यात आलं आहे. मुंबईतील पूर्वनियोजित बैठकांमुळे हा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगपती रतन टाटांच्या भेटीला
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्ली दौऱ्यावर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खोचक टीका केली होती. अजित पवार म्हणाले होते की, काँग्रेस सरकारच्या काळात सर्व निर्णय दिल्लीत व्हायचे. भाजप सरकारचे देखील निर्णय दिल्लीत होतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्णय मुंबईत होतात. शरद पवार मुंबईत असतात. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाच्या वेळी मुंबईत निर्णय व्हायचे. ममता बॅनर्जी यांचे निर्णय कोलकात्याला होतात. पक्ष कोणता आहे हे महत्त्वाचं आहे. आता शिंदे यांचे निर्णय दिल्लीत होतात, त्याला आपण काय करणार असा टोला अजित पवार यांनी लगावला.
Web Title: Eknath Shinde Delhi Tour Cancel
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..