
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांवर निशाणा साधला. त्यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिलं आहे. 'बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. अशी टीका ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या कुटुंबियांवर केली होती. (Eknath Shinde Gets Angry Over Uddhav Thackeray Mentioning Son Shrikant Shinde And Grandson Rudranks )
दसरा मेळाव्याच्या भाषणादरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुलगा श्रीकांत आणि नातू रुद्रांक्ष यांचा उल्लेख केल्याची चिठ्ठी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. कुटुंबियांवर झालेली टीका पाहताच एकनाथ शिंदेंना राग अनावर झाल्याची माहिती त्यांच्या विश्वसनीय समर्थकांनी सांगितलं.
यानंतर “तुम्ही माझ्या दीड वर्षाच्या नातवाला राजकारणात ओढत आहात. तुम्हाला सांगतो ज्या दिवशी त्याचा जन्म झाला तेव्हाच तुमचे पतन सुरू झाले,” असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या असा उल्लेख उद्धव यांनी आपल्या भाषणात केला.
एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील अनेक मुद्दे नियोजित होते. मात्र त्यांच्या मुलाच्या आणि विशेषतः नातवाच्या उल्लेखामुळे ते व्यथित झाल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शिवसेनेतील बंडानंतरही एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका करणे टाळले होते. असे असताना कुटुंबियांवर झालेल्या टीकेमुळे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख ‘ हम दो हमारे दो ‘ असा केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.